Share

IPL 2022 : ना रोनाल्डो, ना मेस्सी..! तुम्हाला माहितीये का रोहित शर्माचा आवडता फुटबॉलपटू?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा सर्व फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार बनला आहे. याशिवाय तो स्पॅनिश फुटबॉल लीग ला लीगासाठी भारताचा अधिकृत राजदूतही आहे. दोन वर्षांपूर्वी रिअल माद्रिद आणि बार्सिलोना यांच्यातील सामना पाहण्यासाठी तो युरोपलाही गेला होता. टीम इंडियाशी संबंधित वचनबद्धतेमुळे रोहित आता फुटबॉल सामना पाहण्यास जाऊ शकत नाही.

रोहितने आपला आवडता फुटबॉलपटू म्हणून झिनेदिन झिदानचे नाव घेतले आहे. रिअल माद्रिदचा माजी फुटबॉलपटू झिदान जगातील विविध मोठ्या क्लबसाठी खेळला आणि १९९८ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या फ्रान्स संघाचा तो महत्त्वाचा खेळाडू होता. आक्रमक मिडफिल्डर म्हणून आपला ठसा उमटवणारा झिदान निवृत्तीनंतर रिअल माद्रिद क्लबचा व्यवस्थापकही झाला. झिदानला १९९८ मध्ये बलोन डी’ओर पुरस्कारही देण्यात आला होता. रोहितही त्याचा मोठा चाहता आहे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहितकडे ४०० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. आयपीएल २०२२च्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या त्याच्या पहिल्या सामन्यात त्याने ३२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४१ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तो अवघ्या १० धावांवर बाद झाला. मुंबई संघाने मोसमात आत्तापर्यंत दोन सामने खेळले आहेत, परंतु दोन्ही सामने गमावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!