मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी सरासरीपेक्षा खूपच कमी राहिली आहे. संघाने स्पर्धेचे सुरुवातीचे चारही सामने गमावले आहेत. संघ गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे. कर्णधार रोहित शर्मालाही आतापर्यंत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्याने ४ सामन्यात ८० धावा केल्या आहेत. रोहितबाबत माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी मोठे विधान केले आहे.
क्रिकइन्फोशी बोलताना मांजरेकर यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदाबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे. ते म्हणाले, ”विराट कोहलीप्रमाणे रोहितही कर्णधारपद सोडून फलंदाजाची भूमिका बजावेल, थोडा आराम करेल. कायरन पोलार्ड आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधार आहे आणि तो त्याला नेतृत्व देऊ शकतो.”
”आयपीएल ऑक्शनपासून मुंबई संघावर प्रश्न उपस्थित होत असल्याचे आहेत. माझ्या मते, संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही. याचा अंदाज मी फार पूर्वीच वर्तवला आहे. रोहित जेव्हा टीम इंडियासाठी खेळतो तेव्हा त्याची फलंदाजी चांगली होते. पण आयपीएलमध्ये त्याच्यावर दबाव येतो. गेल्या ३-४ हंगामापासून असे दिसले आहे”, असेही मांजरेकरांनी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये रोहितला खुणावतोय ‘विराट’ विक्रम; आज फक्त २५ धावा करताच….
- गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- मोठी बातमी! नवाब मलिकांची संपत्ती ईडीकडून जप्त
- IPL 2022 : “जोपर्यंत RCB आयपीएल ट्रॉफी जिंकत नाही, तोपर्यंत…”, भर मैदानात ‘तिनं’ घेतली शपथ!
- “राऊत राष्ट्रवादीचा भोंगा”; संदीप देशपांडे यांचा राऊतांना टोला
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com


