मुंबई: शिवसेना नेते यशवंत जाधव, त्यांचे सहकारी आणि बीएमसी कंत्राटदार यांच्या निवासस्थानी २५ फेब्रुवारी रोजी ईडीला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरी सापडली असून यामध्ये मातोश्रीला २ कोटी रुपयांची भेट दिल्याची नोंद आहे. यावर आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईकरांचे लुटलेले पैसे हे मुंबईकरांना परत मिळाले पाहिजेत आणि त्यासाठी या प्रकरणाची चौकशी एन्फोर्समेंट डिरेक्टरेटच्या माध्यमातून व्हावी, अशी मागणी त्यांनी भाजप तर्फे केली आहे.


