मुंबई: भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग निवृत्ती घेतल्यानंतरही नेहमी चर्चेत असतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तो दररोज क्रिकेटशी संबंधित विषयांवर आपले मत मांडत असतो आणि अनेक खेळाडूंचे पाय खेचतानाही दिसतो. आता असेच काहीसे IPL 2022 च्या पहिल्या सामन्यानंतर झाले आहे.
चेन्नई विरुद्ध कोलकाता (CSK vs KKR) सामन्यात धोनीने (ms dhoni) अर्धशतक ठोकत अप्रतिम कामगिरी केली आहे. मात्र जडेजा (ravindra jadeja) दुसऱ्या टोकावर फटकेबाजी करण्यास अपयशी दिसत होता. याच मुद्द्याला धरत वीरूने (virendra sehwag) या दोघांची फिरकी घेतली. सेहवागने एका मोठ्या यूट्यूब चॅनलवर जडेजा आणि धोनीच्या संदर्भात सांगितले की, ‘आज एक विचित्र घटना घडली आहे. महेंद्रसिंग धोनी जडेजाप्रमाणेच फलंदाजी करत आहे. आणि चेन्नईचा कर्णधार असलेल्या जडेजाने धोनीसारखी फलंदाजी केली आहे. ही एक विचित्र घटना आहे, जडेजावर कर्णधारपदाचे दडपण असू शकते कारण सहसा जडेजा समोर यायचा तेव्हा तो झटपट धावा काढायचा.”
चेन्नईने आपला पहिला सामना कोलकाता विरुद्ध गमावला असला तरी धोनीच्या खेळीने सगळ्यांना प्रभावित केले आहे. चेन्नई आता आयपीएलमधील आपला पुढचा सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ३१ मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळणार आहे. ज्यात चाहत्यांना अपेक्षा आहे की , जुना बिग हिटर जडेजा पुन्हा पाहायला मिळेल.
महत्वाच्या बातम्या
- “अजित पवारांमध्ये धमक असून ते प्रेमाने…”, चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य
- IPL 2022: डबल हेडरच्या पहिल्या सामन्यातील टॉस दिल्लीने जिंकला ; मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण!
- पुढील काळात पोलीस दलालाही ई-वाहनं देण्याचा प्रयत्न- अजित पवार
- Women’s WC 2022: टीम इंडियाचे सेमीफायनल गाठण्याचे स्वप्न पराभवाने भंगले, आफ्रिकेचा ३ विकेट्सने विजय
- मला मुख्यमंत्री ठाकरेंची कुंडली पाहायची आहे- चंद्रकांत पाटील


