पुणे: आताच्या स्पर्धेच्या युगात पोलीसांच्या पाल्यांनीही उत्कृष्ट गुण मिळवून पुढं आलं पाहिजेत,ती कर्तबगार झाली पाहिजेत.फियाट कंपनीनं दिलेली शिष्यवृत्ती पोलीस पाल्यांना उपयुक्त ठरेल. जिल्हास्तरावर ई-ऑफिस प्रणालीचा वापर करणारं पुणे ग्रामीण पोलीस पहिलं कार्यालय ठरलं असून ही बाब चांगली आहे. असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी व्यक्त केले आहे.
पोलीस कल्याण निधीतून पाषाण व बाणेर रोडवर उभारलेल्या पेट्रोल पंपांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाणेरच्या पेट्रोल पंपावर सीएनजी सेवा सुरू करण्यात आल्यानं निधीत चांगली भर पडेल.पुढील काळात पोलीस दलालाही ई-वाहनं देण्याचा प्रयत्न करणार असून इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करावी लागतील. यातून १० टक्के म्हणजेच ५० लाख रुपये निधी त्या भागातील शासकीय इमारतींचं बांधकाम, दुरूस्ती आदींवर करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. पोलीसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम देण्याची पूर्वीची योजना पुन्हा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही अजित पवार यांनी दिली आहे.
पोलीस ठाणे व इतर इमारतींच्या बांधकामासाठी १५ कोटी रुपये खर्च केला जात आहे. राज्यातही याचप्रकारे जिल्हा नियोजन समितीतून पोलीस दलाला पायाभूत सुविधांसाठी निधी दिला जात आहे. नुकताच आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ करून ५ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसंच ग्रामीण पोलीस दलाला डायल ११२ उपक्रमाला वाहनं घेण्यासाठी सुमारे १२ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. काळानुसार तंत्रज्ञानात गतीनं बदल होत आहेत, ही बाब चांगली आहे. परंतु काही अपप्रवृत्ती त्याचा गैरवापरही करत आहेत. त्यासाठी पोलीस दलानंही नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त केला जाणार नाही- आदित्य ठाकरे
- “…ते आता खरं ठरतंय”, यशवंत जाधवांवरील कारवाई संदर्भात देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- केजरीवाल सरकारच्या ‘या’ निर्णयाचे नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले कौतुक
- IPL 2022: डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात RCBचा संघ PBKS ला भिडणार ; वाचा असा असू शकतो संभाव्य संघ
- “मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण ओबीसींवर अन्याय नको”- विजय वडेट्टीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

