🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये पुण्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने बंगळुरुला हरवले. सामन्यादरम्यान राजस्थानचा फलंदाज रियान पराग आणि बंगळुरुचा गोलंदाज हर्षल पटेल यांच्यात बाचाबाची झाली. राजस्थानच्या फलंदाजीनंतर दोघांमध्ये वाद झाला.
रियान परागने २०व्या षटकात हर्षल पटेलला दोन षटकार आणि एका चौकारासह १८ धावा काढल्या. डावाच्या शेवटच्या चेंडूवर रियानने षटकार मारला आणि तो डगआउटच्या दिशेने जाऊ लागला, पण हर्षल पटेल काहीतरी बोलला. यानंतर रियान परागने प्रत्युत्तर देताच दोघांमध्ये भांडणे झाली. राजस्थान रॉयल्सच्या एका सदस्याने हस्तक्षेप करत ते प्रकरण मिटवले.
Harshal patel and riyan parag fight from stadium#riyanparag #harshalpatel #ipl #RRVSRCB #rcbvsrr #pune pic.twitter.com/F15EL5Ayj6
— Adarsh (@Adarsh_Jha_07) April 27, 2022
शेवटच्या षटकातील हर्षल पटेलच्या पहिल्या चेंडूवर रियान परागने एकही धाव घेतली नाही, पण पुढच्या चेंडूवर त्याने चौकार मारला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर दोन धावा आणि चौथ्या चेंडूवर षटकार खेचून त्याने २९ चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. पाचव्या चेंडूवर एकही धाव त्याला काढता आली नाही, पण डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट हर्षल पटेलच्या शेवटच्या चेंडूवर रियान परागने षटकार ठोकला. राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ८ गडी गमावत १४८ धावा केल्या.
https://twitter.com/36__NotAllOut/status/1519014543514501120
असा रंगला सामना…
आयपीएलच्या २०२२ (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्सने दमदार गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs RR) संघाला २९ धावांनी मात दिली. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात बंगळुरू कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोस बटलरसह प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रियान परागने झुंजार अर्धशतक ठोकले आणि राजस्थानने बंगळुरुला १४५ धावांचे आव्हान दिले. शेवटच्या दोन षटकात रियानने ३० धावा काढत संघाला सन्मानजनक धावसंख्येकडे नेले. प्रत्युत्तरात बंगळुरुचा संघ राजस्थानच्या गोलंदाजीपुढे झुकला आणि ११५ धावांवर ऑलआऊट झाला. या विजयासह राजस्थान अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
