Share

IPL 2022 : “तुला करियर मोठं करायचं असेल तर…”, खराब फॉर्मात असलेल्या विराट कोहलीला रवी शास्त्रींचा सल्ला!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याची बॅट आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये शांत आहे. त्याचा खराब फॉर्म कायम असून त्याला ९ सामन्यांत १६च्या सरासरीने केवळ १२८ धावा करता आल्या आहेत. दरम्यान, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी कोहलीने काही काळ विश्रांती घ्यावी आणि आयपीएलच्या चालू हंगामातून माघार घ्यावी, असे म्हटले आहे. शास्त्री म्हणाले, ”विराट बराच काळ सतत क्रिकेट खेळत आहे आणि तो कर्णधारही होता.”

विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या नावावर ५ शतके आणि ४२ अर्धशतके आहेत पण सध्याच्या मोसमात तो खूप वाईट टप्प्यातून जात आहे. विराटने हंगाम सुरू होण्यापूर्वी संघाचे कर्णधारपदही सोडले होते आणि आता तो फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. दरम्यान, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला सल्ला दिला आहे.

शास्त्री म्हणाले, ”मला वाटते की ब्रेक घेणे त्याच्यासाठी आदर्श आहे कारण तो नॉन-स्टॉप क्रिकेट खेळला आहे. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने विश्रांती घेणे शहाणपणाचे ठरेल. तुम्हाला माहीत आहे, की कधीकधी तुम्हाला संतुलन राखावे लागते. तुम्हाला तुमची आंतरराष्ट्रीय कारकीर्द लांबवायची असेल आणि पुढील ६-७ वर्षे तुमची छाप सोडायची असेल, तर आयपीएलमधून बाहेर पडा.”

शास्त्री म्हणाले, ”मी हा सल्ला केवळ कोहलीलाच नाही तर अशा प्रकारे झगडणाऱ्या इतर कोणत्याही फलंदाजाला देईन. तुम्ही १४-१५ वर्षांपासून खेळत आहात. फक्त विराटच नाही तर मी इतर कोणत्याही खेळाडूलाही हे सांगेन. जर तुम्हाला जास्त वेळ खेळायचे असेल आणि भारतासाठी चांगली कामगिरी करायची असेल, तर तुम्हाला तो ब्रेक कुठे घ्यायचा आहे अशी रेषा काढावी लागेल. भारत जिथे खेळत नाही तिथे ब्रेक ऑफ सीझन हा आदर्श असेल.”

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!