🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये आरसीबीच्या शेवटच्या सामन्यात (RCB vs GT) विराट कोहली त्याच्या जुन्या लयीत दिसला. त्याने ५४ चेंडूत ७३ धावांची शानदार खेळी खेळली आणि करो या मरोच्या सामन्यात आपल्या संघाला चॅम्पियन बनवले. या उत्कृष्ट खेळीदरम्यान विराटने आरसीबीसाठी ७००० हजार धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी कोणत्याही खेळाडूला एका संघासाठी इतक्या धावा करता आल्या नाहीत. फ्रेंचायझीसाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सुरेश रैना दुसऱ्या स्थानावर आहे. रैनाने चेन्नईसाठी ५५२९ धावा केल्या आहेत.
प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आरसीबीला गुजरातविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा होता. अशा परिस्थितीत विराटने आपल्या खांद्यावर संघाच्या विजयाची जबाबदारी घेतली आणि या मोसमातील आपली सर्वात मोठी धावसंख्या केली. या हंगामात विराटने गुजरातविरुद्ध दोन अर्धशतके झळकावली आहे.
7000 runs for RCB alone ????
Virat Kohli is something else!#IPL2022 #RCBvsGT pic.twitter.com/0WCy5bkqLl
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 19, 2022
आरसीबीसाठी ७००० हजारांहून अधिक धावा करणाऱ्या विराटनंतर एबी डिव्हिलियर्सचे नाव येते. डिव्हिलियर्सने आरसीबीसाठी ४५२२ धावा केल्या आहेत. त्याचवेळी ख्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेलने ३४२० धावा केल्या आहेत. मात्र, विराटशी बरोबरी साधणे कोणत्याही फलंदाजासाठी खूप अवघड असेल. विराटने आयपीएलच्या चॅम्पियन्स लीगमध्येही आरसीबीसाठी फलंदाजी केली आहे आणि या लीगमध्येही त्याने धावा केल्या आहेत. आता ही लीग बंद झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

