मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला (RCB vs GT) हरवत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. या सामन्यात बंगळुरूचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने अप्रतिम झेल टिपला. मॅक्सवेलने चित्त्याप्रमाणे उडी घेत शुबमन गिलचा आश्चर्यकारक झेल घेतला. त्याच्या झेलचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. शुबमन गिल तिसऱ्याच षटकात ४ चेंडूत धावा काढून बाद झाला. त्याची विकेट वेगवान गोलंदाज जोस हेझलवूडला मिळाली. स्लिपवर हवेत सूर मारताना त्याने अप्रतिम झेल घेतला. मॅचमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या हभजन सिंहने त्याला उडता मॅक्सी असेही म्हटले होते. यानंतर विराट कोहलीने त्याला मिठी मारली. गिलने चालू मोसमात ४००हून अधिक धावा केल्यामुळे ही विकेटही महत्त्वाची होती.
ICYMI – A stunning one handed grab, courtesy @Gmaxi_32 ????????
????️????️https://t.co/xktmU6S6ss #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2022
असा रंगला सामना…
आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला (RCB vs GT) ८ गड्यांनी मात देत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात कप्तान हार्दिक पंड्याच्या अर्धशतकी खेळीमुळे गुजरातने बंगळुरूला १६९ धावांचे आव्हान दिले. या सामन्यात टॉस जिंकलेल्या गुजरातने प्रथम फलंदाजी स्वीकारली. प्रत्युत्तरात विराट कोहली-फाफ डु प्लेसिसच्या शतकी भागीदारीच्या जोरावर बंगळुरूने १८.४ षटकात सामना खिशात घातला. विराटने कमबॅक करत ७३ धावांची खेळी केली. बंगळुरूच्या विजयामुळे पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

