🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या चालू हंगामात, राजस्थान रॉयल्स संघाने मैदानावर जशी कामगिरी केली आहे, जशी त्यांच्या सोशल मीडिया संघाने मैदानाबाहेर केली आहे. राजस्थानची सोशल मीडिया टीम चाहत्यांना सतत कंटेंट देत आहे आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळीही राजस्थानच्या ट्विटरवर एक व्हिडिओ टाकण्यात आला आहे, जो पाहून लोकांना हसू आवरता आले नाही.
ट्रेंट बोल्ट, जिमी नीशम आणि डॅरिल मिशेल यांनी ‘फिर हेरा फेरी’ चित्रपटातील गाण्यावर अभिनय केला आहे. चित्रपटाच्या शेवटच्या गाण्यात अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी धूम धडाका गँग नावाच्या बँडसाठी गाणे गाताना दिसले होते. आता या तीन किवी खेळाडूंनीही हेच गाणे गाण्याचा प्रयत्न केला आहे.
The Dhoom Dhadaka gang has three new members! ????????????#RoyalsFamily | @JimmyNeesh | @dazmitchell47 pic.twitter.com/cAoh0yvFX5
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 18, 2022
गुणतालिकेत राजस्थानचे १६ गुण आहेत आणि त्यांना आज रात्री चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळायचा आहे. राजस्थानला या सामन्यात विजय आवश्यक आहे कारण हा सामना जिंकल्यास त्यांचे प्ले-ऑफमधील स्थान निश्चित होईल. एवढेच नाही तर हा सामना त्यांनी चांगल्या फरकाने जिंकला तर ते टॉप-२ मध्ये राहूनही लीग टप्पा संपवू शकतात. टॉप २ मधील संघाला अंतिम फेरीत जाण्याच्या दोन संधी मिळतात.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
