Share

राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीनंतर बृजभूषण सिंग म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

उत्तर प्रदेश : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित होण्याच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरेंच्या दौऱ्याला आव्हान देणाऱ्या भाजप खासदार बृजभूषण सिंग यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास तरी स्थगित झाल्याची माहिती स्वतः राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिली आहे. राज ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे अयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याचं सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यात होणाऱ्या सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार आहोत, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. आता यावर बृजभूषण सिंग यांच्याकडून प्रतिक्रिया आली आहे.

“येत्या पाच जून रोजी आम्ही अयोध्येमध्ये शरयू नदीत स्नान करणार आहोत. तेथील साधू-संतांसोबत आम्ही पूजा-पाठही करणार आहोत,” असं बृजभूषण सिंग यांनी म्हंटले आहे. “राज ठाकरे यांनी आत्ता आपला अयोध्या दौरा स्थगित केला असला तरीही आम्ही अयोध्येला नक्की जाणार आहोत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा वाढदिवसही आम्ही अयोध्यामध्ये साजरा करणार आहोत,” असं बृजभूषण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हंटले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस पाच जून असतो. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या खासदाराकडून विशेष कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे. फेसबुकवरुनही त्यांनी याविषयी एक पोस्ट केली आहे.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तरप्रदेश मधील भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी कडाडून विरोध सुरु होता. आधी उत्तर भारतीय लोकांची माफी मागा त्यानंतरच अयोध्याला या, अशी ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितले आहे. मात्र आता प्रकृतीच्या कारणामुळे तुर्तास तरी राज ठाकरे यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भात २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे आपली सविस्तर भूमिका मांडतील, सविस्तर कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, असे राज ठाकरे यांनी ट्विट करून सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!