मुंबई : बॉलीवूडमधील कलाकारांसारखे हुबेहूब दिसणारे लोक नेहमी चर्चेत असतात. त्यांचे व्हिडीओ सतत सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. व्हिडीओ बनवणारे बरेच लोक कन्टेन क्रिएटर म्हणून काम करतात. यामध्येच आता अभिनेत्री दिशा पाटणी हिच्यासारख्या दिसणाऱ्या महिलेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये मंडप आणि लग्नसोहळा दिसत आहे. यामध्ये दिशा पाटणी ची डुप्लीकेट ब्रायडल वेअरमध्ये दिसत आहे.
दिशा पाटणीच्या डुप्लीकेट महिलेचा व्हिडीओ मध्ये चेहरा पूर्णपणे स्पष्ट दिसत आहे, पण नवरदेवाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. व्हिडीओमध्ये लग्नविधी सुरु असलेला दिसत आहे. यामध्ये ती नवरदेवाच्या बोटात अंगठी घालताना देखील दिसत आहे. दिशा पाटणी ची डुप्लीकेट महिला घाबरलेली दिसत आहे. अनेक व्हायरल प्लॅटफॉर्म्सवरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे. Giedde या पेजवरून हा व्हिडीओ शेअर झाला असून त्याला ७० हजार व्युज आणि ९ हजार लाईक्स आहेत. टायगर श्रॉफला सोडून लग्न केलं अशा गमतीशीर कमेंट लोकांनी त्या व्हायरल व्हिडीओवर केल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/CcA4AFzlUaN/?utm_source=ig_web_copy_link
बॉलिवूडमधल्या कलाकारांच्या कपड्यांपासून त्यांच्या डेटिंग लाईफपर्यंत सर्व गोष्टी जाणून घेण्यात लोक उत्सुक असतात. दिशा पाटणीचं अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत कायम नाव जोडलं जात. ते दोघे रीलेशनमध्ये असल्याच्या बातम्या सतत समोर येत असतात. या दोघांमधलं नात नेमक काय आहे हे सपष्ट नाही, पण ते कायम सोबत फिरत असतात.
महत्वाच्या बातम्या :


