मुंबई : आयपीएल २०२२ चा तिसरा सामना आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून धमाकेदार फलंदाजीचे प्रदर्शन दिसले. आरसीबीचा नवा कर्णधार फाफ डू प्लेसिसने कर्णधारपदाची ८८ धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने ४१* धावांची शानदार खेळी करत संघाला २०० च्या पुढे मजल मारण्यास मदत केली. आरसीबीने पंजाबसमोर २०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्यानंतरही संघाची निराशा झाली. या पराभवानंतर आरसीबीच्या नावावर अनेक लाजिरवाणे विक्रम जमा झाले आहेत.
IPL मध्ये, स्कोअर बोर्डवर सर्वाधिक धावा करणारा संघ सामन्यावर वर्चस्व गाजवेल असे मानले जाते, परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) बाबतीत हे उलट दिसते. आरसीबीने पंजाबसमोर २०५ धावांचे लक्ष्य ठेवले, तर पंजाबने (PBKS) अवघ्या १९षटकांत हे लक्ष्य गाठले. आयपीएलचा इतिहास पाहता २०० हून अधिक धावा करूनही आरसीबीला चौथ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघ २०० धावा करून सर्वाधिक सामने गमावणारा संघ ठरला आहे. याआधी आरसीबीविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जने २०१२ आणि २०१८ मध्ये २०६ धावांचे लक्ष्य गाठले होते. २०१९ मध्ये KKR २०६ धावा करण्यात यशस्वी ठरला होता. या सर्व संघांनी २०० हून अधिक धावा करून आरसीबीचा पराभव केला आहे.
इतकेच नव्हे तर आरसीबीच्या गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात जास्त धावा देऊन आपले नाव यादीत नोंदवले आहे. तिसऱ्या सामन्यात आरसीबीने पंजाबविरुद्ध २३ अतिरिक्त धावा दिल्या तर पंजाबने २२. या सामन्यातील अतिरिक्त धावा आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वोच्च ठरल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम डेक्कन चार्जर्स आणि पंजाब किंग्जच्या नावावर होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेस वऱ्हाडी नव्हे, तर बाप आहे’, विखे-पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याला नाना पटोलेंचे उत्तर
- अजून एक जेतेपद..! पी. व्ही. सिंधूनं जिंकली स्विस ओपन स्पर्धा
- “काही दिवटे मातोश्रीना पैसे आणि भेटीची घड्याळं…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भातखळकरांचे टीकास्त्र
- बापरे..! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला १२ लाखांचा दंड; वाचा नक्की झालं काय!
- ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात मोठा राडा; विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली


