Share

‘काँग्रेस वऱ्हाडी नव्हे, तर बाप आहे’, विखे-पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याला नाना पटोलेंचे उत्तर

Published On: 

औरंगाबाद : काल (२७ मार्च) प्रसार मध्यमांशी संवाद साधत असतांना भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस वऱ्हाडी, असे वर्णनही केले. दरम्यान, यावरून आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विखे-पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नाना पटोले म्हणाले की,‘काँग्रेस बाप आहे, बापच राहणार, सुजय विखे नवखे आहेत. त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही.’ तसेच सध्या महाराष्ट्रात भाजपतर्फे जनतेचे मनोरंजन सुरू आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

दरम्यान, ‘महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको तर काँग्रेस ही जेवणापुरती आलेले वऱ्हाडी आहेत. नवऱ्याने दुसरी सवत आणू नये म्हणून शिवसेना मूकपणे अन्याय सहन करीत आहे. कितीही तिरस्कार केला तरी जेवणासाठी वऱ्हाडी म्हणून आलेली काँग्रेस हटायला तयार नाही’, असे सुजय विखे पाटील म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!