Share

IPL 2022 : “ते नक्कीच प्लेऑफमध्ये पोहोचणार…”, यंदाच्या विजेत्याबाबत रवी शास्त्रींची ‘मोठी’ भविष्यवाणी!

Published On: 

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) नवा कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली चांगले क्रिकेट खेळून आयपीएलच्या १५व्या हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला. पंजाब किंग्जविरुद्धच्या पराभवाने आपल्या मोहिमेची सुरुवात करणाऱ्या तीन वेळा उपविजेत्या आरसीबीने यंदा मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सला पराभूत केले आहे.

रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले, ”मला विश्वास आहे की, या हंगामात आम्हाला नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल. या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चांगली कामगिरी करत असून ते नक्कीच प्लेऑफमध्ये पोहोचतील. जसजशी स्पर्धा पुढे जातेय तसे ते फॉर्ममध्ये येत आहेत. ते आता चांगल्या स्थितीत आहेत. प्रत्येक सामन्यात ते अधिक चांगले होत आहेत. या मोसमात संघाचा नवा कर्णधार डू प्लेसिस, माजी कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल महत्त्वाची भूमिका बजावतील.”

शास्त्री म्हणाले, ”विराट चांगली कामगिरी करत आहे. ग्लेन मॅक्सवेल संघासोबत आहे आणि तो किती धोकादायक ठरू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तो फिरकीपटूंना ठोकण्यात मास्टर आहे आणि स्पर्धा जसजशी पुढे जाईल तसतसा तो आरसीबीसाठी महत्त्वाचा ठरेल. आणि मग फॉफ त्याच्या संघाचे नेतृत्व करत आहे, जो त्यांच्यासाठी बोनस आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!