Share

IPL 2022 MI vs LSG : किती लाजिरवाणं..! राहुल पडला रोहितवर भारी; मुंबई इंडियन्सचा सलग सहावा पराभव!

Published On: 

मुंबई : IPL 2022 MI vs LSG – आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सला सलग सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावलेल्या केएल राहुलच्या लखनऊने दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईला २० षटकात २०० धावांचे आव्हान दिले. मुंबईच्या गोलंदाजी विभागात पुन्हा गफलत पाहायला मिळाली, शिवाय क्षेत्ररक्षणही सुमार दर्जाचे राहिले. लखनऊच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची फलंदाजीही ढेपाळली. २० षटकात मुंबईला ९ बाद १८१ धावांपर्यंतच पोहोचता आले.

मुंबईचा डाव

इशान किशन आणि रोहित शर्मा यांना पुन्हा एकदा मुंबईला चांगली सुरुवात करून देता आली नाही. लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खानने रोहितला (६) बाद केले. तर मार्कस स्टॉइनिसने इशानचा (१३) त्रिफळा उडवला. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविसने १३ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ३१ धावांची आतषबाजी खेळी केली. दीपक हुडाकरवी झेलबाद करत आवेशने ब्रेविसला आवर घातला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी संघाला आधार दिला. या दोघांनी १३व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. जेसन होल्डरने तिलकला (२६) बाद करत ही भागीदारी मोडली. पुढच्याच षटकात रवी बिश्नोईने सुर्यकुमारला (३७) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आवश्यक धावा आणि शिल्लक चेंडू यांच्यातील अंतर वाढत गेल्यामुळे कायरन पोलार्डला चांगली फटकेबाजी करता आली नाही. २० षटकात मुंबईला ९ बाद १८१ धावाच करता आल्या.

लखनऊचा डाव

कप्तान केएल राहुल आणि क्विंटन डी कॉ़क यांनी लखनऊसाठी अर्धशतकी सलामी दिली. फिरकीपटू फॅबियन एलनने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्याने डी कॉकला (२४) पायचीत पकडले. त्यानंतर आलेल्या मनीष पांडेनेही (३८) राहुलसोबत अर्धशतकी भागीदारी उभारली. चांगल्या लयीत खेळणाऱ्या राहुलने १२व्या षटकात आपले अर्धशतक फलकावर लावले. मुरुगन अश्विनने मनीषची दांडी गुल केल्यानंतर मार्कस स्टॉइनिसही (१०) लवकत तंबूत परतला. १९व्या षटकात राहुलने टायमल मिल्सला चौकार ठोकत आपले शतक साजरे केले. १००व्या आयपीएल सामन्यात शतक ठोकणारा केएल राहुल पहिला फलंदाज ठरला. २० षटकात लखनऊने ४ बाद १९९ धावा केल्या. राहुलने ६० चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद १०३ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!