मुंबई : आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला. यामध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या जयश्री जाधव या ९६२२६ इतकी मते मिळवत विजय खेचून आणला. भाजपचे सत्यजित कदम यांना ७७४२६ इतकी मते मिळाली आहे.
निवडणुकी अगोदर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात प्रचारासाठी तळ ठोकून होते. “कोल्हापुरातून निवडणूक हरल्यास राजकारण सोडून हिमालयात जाईन”, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर उत्तरमधील निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर पाटलांच्या याच वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.
यानंतर आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावरून खोचक टोला लगावला आहे. जयंत पाटील म्हणाले, “पराभव एका मताने केला काय आणि हजार मतांनी केला काय, पराभव हा पराभव असतो. चंद्रकांत पाटलांना निवडणुकीला उभं राहण्याची संधी होती, पण असो. चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील, तर मीही जाईन. माझी देखील हिमालयात जाण्याची इच्छा आहे. चंद्रकांत पाटलांचे आणि माझे चांगले संबंध आहेत,” असं म्हणत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

