Share

IPL 2022: ‘एक चांगला खेळाडू चांगला कर्णधार असेलच असे नाही’; कोहलीच्या कोचने उठवला जडेजाच्या कर्णधारपदावर प्रश्न

Published On: 

मुंबई: एम एस धोनीने स्पर्धा सुरु होण्याच्या दोन दिवसांआधीच कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रवींद्र जडेजाला नवीन कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. यावर आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी रवींद्र जडेजाला CSKचा नवा कर्णधार बनवल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार असलेल्या धोनीने (ms dhoni) कर्णधारपद सोडत सर्वांना आश्चर्यचकित केले. जडेजाची (ravindra jadeja) संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू म्हणून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मात्र विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (rajkumar sharma) यांनी जडेजाच्या कर्णधार होण्यावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, “रवींद्र जडेजा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. यात काही शंका नाही , पण त्याने फारसे कर्णधारपद केले नाहीये किंवा त्याला कर्णधारपदाचा तेवढा अनुभवही नाही. आता तो संघाला कसा पुढे नेतो हे पाहण्यासारखे असेल. काहीवेळा एक चांगला क्रिकेटपटू हा चांगला कर्णधार असतोच असे नाही, आणि हे अगदी उलट असते.”

विराटच्या कोचच्या म्हणण्यानुसार जडेजाला कर्णधार म्हणून जास्त अनुभव नाहीये. आयपीएल मध्ये कर्णधार म्हणून त्याचा हा पहिलाच सीजन असेल. त्यामुळे धोनीने तयार केलेल्या विजयी संघाला एक कर्णधार म्हणून जडेजा कसा पुढे नेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज चेन्नई सुपर किंग्जचा कोलकाता नाईट रायडर्सशी आयपीएल स्पर्धेचा पहिला सामना होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!