🕒 1 min read
मुंबई: आजपासून आयपीएलला सुरूवात होत आहे. पुरुषाच्या क्रिकेटमध्ये आयपीएल सर्वात मोठ्या लीगपैकी एक आहे. आता बीसीसीआयने आयपीएलचे यश बघता महिला क्रिकेटसाठीही याच्या आयोजनाची तय्यारी सुरु केली आहे. महिला आयपीएल स्पर्धा पुढील वर्षी भारतात सुरू होण्याची शक्यता आहे. याची पुष्टी करताना बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, महिला आयपीएल २०२३ मध्ये सुरू होणार आहे. गेल्या वर्षी ही स्पर्धा आयोजित न केल्याने बीसीसीआयला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. महिला आयपीएल सुरू करण्यासाठी बीसीसीआयला पुढील हंगामात लीग सुरू करण्यासाठी एजीएमची मंजुरी आवश्यक असेल.
T20 क्रिकेटला भारतात पसंत केले जाते. पुरुषांच्या आयपीएलच्या (IPL) धर्तीवर बीसीसीआयने (BCCI) महिला आयपीएल करण्याची योजना आखली आहे. बीसीसीआय पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये ही स्पर्धा सुरू करू शकते. ज्यामध्ये ६ संघ सहभागी होऊ शकतात. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिल (GC) च्या मुंबईत झालेल्या बैठकीत महिला क्रिकेटपटूंसाठी सहा संघांची वार्षिक T20 स्पर्धा सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असा निर्णय घेण्यात आला. ज्यात गांगुली यांनी सांगितले की, “महिला आयपीएलला एजीएमची मंजुरी आवश्यक असेल. पुढच्या वर्षी ते सुरू करण्याचा आमचा विचार आहे.”
भारतीय क्रिकेटरसिक आयपीएलसाठी बऱ्याच दिवसांपासून मागणी करत आहेत. त्यामुळे महिला लीग सुरू करण्यासाठी बीसीसीआयवर दबाव होता. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान सारख्या देशांनी आधीच महिला T20 लीग सुरू करण्याबाबत बोलले आहे. महिला आयपीएलबद्दल भारतातील चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच आयपीएल मधील ३ संघानी महिला आयपीएलसाठीही इंटरेस्ट दाखवला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार”, अजित पवारांनी सांगितले कारण
- “महाराष्ट्राच्या मंत्रालयात लता दीदींची गाणी कानावर पडली पाहिजे”, राज ठाकरेंची मागणी
- “खंडणी वसूली सोडून तुमचं सरकार…”, भातखळकरांचे टीकास्त्र
- किरीट सोमय्या दापोलीकडे रवाना, शिवसेना आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता
- “जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो ईश्वर”, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
