मुंबई: आयपीएल २०२२ चा महासंग्राम आजपासून सुरू होत आहे. मेगा ऑक्शनदरम्यान अनेक खेळाडू त्यांच्या जुन्या संघांपासून वेगळे झाले. जे या मोसमात आपल्या जुन्या संघांविरुद्ध खेळताना दिसणार आहे. त्यापैकी एक म्हणजे आरसीबीचा नवा कर्णधार फाफ डू प्लेसिस. तो धोनीच्या नेतृत्वाखालील CSK कडून अनेक वर्ष क्रिकेट खेळला. मात्र यंदा डु प्लेसिस सीएसकेविरुद्ध खेळणार आहे, मात्र त्याआधीच धोनी-डुप्लेसिसचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.
फाफ डू प्लेसिस (Faf du plessis) हा गेल्या काही हंगामात चेन्नईचा भाग होता, परंतु यावर्षी मेगा ऑक्शनमध्ये , RCB ने त्याला ७ कोटीत संघात सामील केले, तसेच त्याला IPL 2022 साठी संघाचा कर्णधार बनवले. आजपासून IPL 2022 चा बिगुल वाजणार आहे. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. सीएसकेचा नवा कर्णधार जडेजाच्या नेतृत्वाखाली संघ पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी सीएसकेच्या खेळाडूंनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (आरसीबी) खेळाडूंची भेट घेतली. यादरम्यान डुप्लेसिस आणि धोनी (MS Dhoni) यांची भेट झाली. डु प्लेसिसने त्याचा जुना कर्णधार धोनीला मिठी मारली आणि इतर खेळाडूंसोबत तो चर्चा करताना दिसला.
आरसीबीचा नवा कर्णधार फाफ डु प्लेसिसने सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनीचे कौतुक केले. फाफ डु प्लेसिसने धोनीच्या नेतृत्वाखाली बरेच क्रिकेट खेळले आहे. फाफ २०१२ पासून धोनीच्या नेतृत्वाखालील चार वेळा आयपीएल चेन्नईचा प्रमुख सदस्य होता. त्याला संघाने पार्ट खरेदी न केल्याने चेन्नईचे चाहते नाराज होते. मात्र आता त्या दोघांचे फोतो बघून चाहते आनंदी झालेले दिसले.
महत्वाच्या बातम्या
- “भारताचा राष्ट्रवाद धर्मावर नव्हे तर…”, शशी थरूर यांचे मोठे वक्तव्य
- महिला क्रिकेटसाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय; महिलांच्या आयपीएलचे नियोजन होणार!
- “आमदारांना मोफत घरं मिळणार…”, अजित पवारांचे मोठे वक्तव्य
- “…त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार”, अजित पवारांनी सांगितले कारण
- “महाराष्ट्राच्या मंत्रालयात लता दीदींची गाणी कानावर पडली पाहिजे”, राज ठाकरेंची मागणी


