मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज शिवसेना भवनात दुसरी पत्रकार परिषद चालू आहे. यावेळी ते काय खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी अरविंद सावंत यांचीही उपस्थिती आहे. संजय राऊत म्हणाले की, मुंबईत धाडीवर धाडी पडत आहेत. तर आम्ही विचार केला की, आम्हीही एक रेड पाडावी.
सध्या मुंबईत ईडीची भानामती चालू आहे. शिवसेनेला त्रास देण्यासाठी धाड सुरु आहे. ईडीला फक्त शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसवर धाड पडण्यासाठी दिसते का? इनकम TAX आणि ईडीला आम्ही आतापर्यंत ५० नावे पाठवली आहेत. मात्र ईडीला ती नावे दिसत नाहीत. सुमितकुमार नरवल जो अगोदर दुध विकायचा त्याच्याकडे ८ हजार कोटींची सांपत्तिक उठून आली?असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे. ‘गंगा मिशन’ वरून त्यांनी टीका केली. इडीबाबद पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पुरावे पाठविले असून ही सर्व माहिती पत्रात आहे आणि टप्प्याटप्प्याने बाहेर येईल. मात्र तो फक्त एक पार्ट आहे. असे मी अजून १० पार्ट पाठवणार असलायचे राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

