Share

जितेंद्र नवलानी आणि किरीट सोमय्यांचा काय संबंध? राऊतांचा सवाल

Published On: 

मुंबई: जितेंद्र नवलानी (Jitendra Navlani) हे ईडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्या ७ कंपन्यामधून १५ कोटी ट्रान्सफर केले गेले. नवलांनी यांना अनेक कंपन्यांनी कोट्यवधी रुपये का दिले? तसेच किरीट सोमय्या (Kirit Somaiya) एक वसुली एजंट असून त्यांचा आणि जितेंद्र नवलानी यांचा संबंध का? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

मुंबई पोलीस या खंडणीची चौकशी करणार आहे. ज्या कंपन्यांवर ईडीने धाड टाकली त्या कंपन्यांना नवलानी यांनी पैसे दिले.हा सर्व पैसा विदेशात जात असून ईडीच्या चार अधिकाऱ्यांची नावे मुंबई पोलिसांकडे दिली असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान मुंबई मनपा निवडणुकीपर्यंत प्रत्येक वार्डात धाडी पडतील. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच इनकम TAX आणि ईडीला आम्ही आतापर्यंत ५० नावे पाठवली आहेत. मात्र ईडीला ती नावे दिसत नाहीत. सुमितकुमार नरवल जो अगोदर दुध विकायचा त्याच्याकडे ८ हजार कोटींची सांपत्तिक उठून आली?असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान सोमय्या यांचे वाधवान सोबत संबंध काय आहेत, ते त्यांनी स्पष्ट करावे. असे आव्हानही राऊत यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!