Share

IPL 2022 : मुंबईनंतर चेन्नईही आयपीएल २०२२मधून बाहेर, जाणून घ्या इतर संघांची स्थिती!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये ५९वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कमी धावसंख्येच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून पराभव केला. गुणतालिकेत नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर असलेल्या संघांमधील या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जची (CSK) स्पर्धेतील टिकून राहण्याची थोडीशी आशाही या पराभवामुळे संपुष्टात आली. यामुळे आयपीएलचे दोन सर्वात यशस्वी संघ स्पर्धेतून बाहेर पडले असून ते उर्वरित सामने जिंकले तर इतर संघांचा रणनीती नक्कीच खराब करतील.

पाच वेळच्या चॅम्पियन मुंबईने गोलंदाजांच्या बळावर चेन्नईला १६ षटकांत ९७ धावांत गुंडाळले. आयपीएलमध्ये ही त्यांची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. २०१३ मध्ये चेन्नईचा यापूर्वीचा स्कोअर ७९ हा मुंबईविरुद्ध होता.

९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने पॉवरप्लेमध्ये चार गडी गमावले. पण तिलक वर्मा (नाबाद ३४) आणि हृतिक शोकीन (१८) यांनी चांगला खेळ करत संघाला विजयापर्यंत नेले. शोकीन १३व्या षटकात मोईन अलीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या ८१ अशी होती. त्यानंतर टीम डेव्हिडने (नाबाद १६) धावा करत संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईसाठी मुकेश चौधरीनेही चार षटकांत २३ धावा देत ३ बळी घेतले.

त्याअगोदर नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजांनी त्यांच्या विजयाचा पाया रचला. डॅनियल सॅम्सच्या पहिल्याच षटकात चेन्नईला दोन धक्के बसले. ज्यामुळे चेन्नईवर दबाव आला ज्यातून ते शेवटपर्यंत सावरले नाहीत. चेन्नईसाठी, कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकाकी झुंज देत ३६ धावा करत नाबाद राहिला. तर दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या. धोनीशिवाय इतर फक्त तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले.

मुंबईसाठी डॅनियल सॅम्सने चार षटकांत १६ धावांत ३ बळी घेत शानदार कामगिरी केली. रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय यांनी अनुक्रमे २७ आणि २२ धावा देत ३ षटकांत प्रत्येकी २ विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहने आणि रमनदिपने प्रत्येकी १ बळी मिळवला.

गुणतालिकेत संघांची स्थीती

गुजरात टायटन्स संघाने १२ सामन्यांत ९ विजय मिळवले आहेत. संघाचे गुणतालिकेत १८ झाले आसून प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाने १२ सामन्यांत ८ विजय मिळवले असुन ते गुणतालिकेत १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. राजस्थान रॉयल्सने १२ सामन्यांत ७ विजय मिळवले असुन गुणतालिकेत १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १२ सामन्यांत ७ विजय मिळवले असुन गुणतालिकेत १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत.

दिल्ली कॅपिटल्स संघाने १२ सामन्यांत ६ विजय मिळवले असुन गुणतालिकेत १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत. सनरायजर्स हैदराबाद संघाने ११ सामन्यांत ५ सामने जिंकले असुन गुणतालिकेत १० गुणांसह सहाव्या स्थानावर आहेत. कोलकाता नाइट रायडर्स संघाने १२ सामन्यांत ५ विजय मिळवले असुन गुणतालिकेत १० गुणांसह सातव्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्जने ११ सामन्यांत ५ विजय मिळवले असुन गुणतालिकेत १० गुणांसह आठव्या स्थानावर आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघाने १२ सामन्यांत ४ सामने जिंकले असुन गुणतालिकेत ८ गुणांसह नवव्या स्थानावर आहेत. मुंबई इंडियन्स संघाने १२ सामन्यांत ३ विजय मिळवले असुन गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

 

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!