Share

IPL 2022 खेळत असलेल्या जिमी नीशमला न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून दणका!

Published On: 

मुंबई : न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आगामी हंगाम २०२२-२३ साठी केंद्रीय कराराची घोषणा केली. बोर्डाने जाहीर केलेल्या केंद्रीय करारांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलला या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलला प्रथमच केंद्रीय करारामध्ये स्थान मिळाले आहे. सध्या आयपीएल २०२२ (IPL 2022) खेळत असलेल्या अनुभवी अष्टपैलू जिमी नीशमला २० खेळाडूंच्या यादीत स्थान मिळालेले नाही. नीशमने २०१९मध्ये चमकदार कामगिरी केली आणि संघाला वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत नेले. गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतही त्याने न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले होते.

नीशमने शेवटचा कसोटी सामना २०१७मध्ये खेळला होता. गेल्या एका वर्षात त्याने केवळ ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याची कामगिरी चांगली झाली नाही. नीशमच्या जागी ब्रेसवेलचा करारात समावेश करण्यात आला आहे. नुकताच त्याचा इंग्लंड दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. ब्रेसवेलने याच वर्षी मार्चमध्ये नेदरलँड्सविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

न्यूझीलंड क्रिकेटने आगामी क्रिकेट हंगामासाठी २० खेळाडूंना आपल्या केंद्रीय करारामध्ये स्थान दिले आहे. टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, मॅट हेन्री, काइल जेमीसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, नील वॅगनर, केन विल्यमसन, आणि विल यंग यांचा बोर्डाने वार्षिक करारात समावेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!