Share

IPL 2022 CSK vs MI : वाढदिवशी पोलार्डला का खेळवलं नाही? झहीर खाननं दिलं ‘असं’ उत्तर!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा (CSK vs MI) पराभव करत प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा संपुष्टात आणल्या. स्पर्धेच्या ५९व्या सामन्यात मुंबईने चेन्नईला १६ षटकात ९७ धावांवर ऑलआऊट केले. त्यानंतर ३१ चेंडू राखून लक्ष्य पाच विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. या सामन्यात बर्थडे बॉय कायरन पोलार्ड मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता.

मुंबई इंडियन्सच्या झहीर खानने पोलार्ड का खेळला नाही, याबाबत मत दिले. “प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. विजयाचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही मैदानात जा. हंगाम सुरू झाल्यानंतर आमच्यात याविषयी बरीच चर्चा झाली. आम्ही प्रत्येकाला एकजूट ठेवण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत जेणेकरून प्रक्रिया सुरू राहावी आणि प्रत्येक सामन्याची दृष्टी अगदी स्पष्ट असेल.”

”फ्रेंचायझीच्या यशात कायरन पोलार्डचे योगदान अतुलनीय आहे. तो या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग होता. खरेतर हा स्पर्धेचा शेवटचा टप्पा आहे, त्यामुळे आम्हाला काही नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची होती आणि एक व्यक्ती आणि संघाचा सदस्य म्हणून पोलार्डने त्याला पाठिंबा दिला”, असे झहीरने सांगितले. नाणेफेकीच्या वेळी मुंबईचा कर्णधार रोहित म्हणाला, ”भविष्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलार्डला बाहेर ठेवण्यात आले आहे.” मुंबई इंडियन्सच्या सर्व विजेतेपदांचा एक भाग असलेल्या पोलार्डसाठी सध्याचा हंगाम चांगला गेला नाही. त्याने ११ सामन्यात १४४ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!