Share

नवाब मलिकांना कोर्टाचा दिलासा; खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी!

Published On: 

मुंबई : २३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यांनतर नवाब मलिक यांची प्रकृती खालावली होती. जे जे हॉस्पिटलमधून आर्थर रोड जेल मध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आले होते. नवाब मलिक यांना किडनीच्या आजारामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नवाब मलिक यांची प्रकृती चिंताजनक असल्याची त्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर माहिती दिली होती. आता नवाब मालिकांबाबद एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना जामीन दिला नसला तरी त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तुरुंगात असल्यामुळे नवाब मलिक यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यामुळे हा निर्णय मलिक यांच्यासाठी दिलासा मानला जात आहे. नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार होणार आहेत. मलिक यांच्यासोबत एकाच कुटुंब सदस्याला राहण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1525007381671059456?s=20&t=CGoocsQAWPiRn00VNprERw

 

भाजपचे राजीनाम्यासाठी आंदोलन –

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानभवनच्या पायऱ्यांवर भाजपने “राजीनामा द्या, नवाब मलिक राजीनामा द्या”, अशा घोषणा देत आंदोलन केले. या आंदोलनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते आशिष शेलार यांचीही उपस्थिती होते. भाजप नेत्यांनी “कोण म्हणते देणार नाय, घेतल्याशिवाय सोडणार नाय”, अशा घोषणाही दिल्या होत्या. ठाकरे सरकार दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या नवाब मलिकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील भाजपने केला होता.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!