Share

“शिवसेना कश्मिरी पंडितांच्या मुद्द्याकडे अत्यंत संवेदनशीलपणे पाहत आहे” – संजय राऊत

Published On: 

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात काल गुरुवारी दहशतवाद्यांनी तहसीलदार कार्यालयात घुसून काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. माजी मुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी या काश्मिरी पंडिताच्या हत्येवरून मोदी सरकारवर टीका केली. अल्पसंख्याकांना सुरक्षा देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे ते म्हणाले. याबाबद संजय राऊत यांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.

सातत्याने काश्मिरी पंडितांच्या हत्या पुन्हा सुरू झालेले आहेत. काल तरुण काश्मिरी पंडितांची हत्या त्याच्याच कार्यालयात करण्यात आली. काश्मीरचा माहोल पुन्हा एकदा बिघडवण्याचा प्रयत्न जो सुरू झाला आहे. हे प्रधान मंत्री आणि गृहमंत्री यांनी अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजे. काही काळ निवडणुकांचे राजकारण दूर ठेवले पाहिजे. कश्मीरी पंडितांची घरवापसी आणि त्यांची सुरक्षा हा भारतीय जनता पक्षाचा मुख्य अजेंडा होता. त्यासाठी 370 कलम हटवण्यात आले. कश्मीरचे विभाजन करण्यात आले, त्यासाठी आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला. तरीही कश्मिरी पंडित यांची घरवापसी होऊ शकली नाही, काश्मीर आजही अशांत आहे, फक्त बातम्या बाहेर येत नाहीत. असे संजय राऊत म्हणाले.

लाऊड स्पीकर, हनुमान चालीसा असे मुद्दे घेऊन कश्मीर सारख्या विषयावरून लोकांचे मन तुम्ही विचलित करू शकत नाही. लोकांचे अत्यंत बारीक लक्ष या विषयाकडे आहे. शिवसेना कश्मीरी पंडित यांच्या मुद्द्याकडे अत्यंत संवेदनशीलपणे पाहत आहे. एका बाजूला चीन घुसले आहे तर दुसर्‍या बाजूला कश्मीर अशांत आहे हे देशाला परवडणारे नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!