नवी दिल्ली : सर्वांच्या मनावर राज्य करणारा तेलगू इंडस्ट्रीतला अभिनेता महेश बाबू आपल्या स्टाईल साठी ओळखले जातात. नुकतेच त्याचे एक विधान सोशल मिडीयावर खूप व्हायरल झाले होते. बॉलिवूडला ते परवडणार नाही. बॉलिवूड म्हणजे वेळ वाया घालवणे आहे. असं महेश बाबू म्हणाला होता. महेश बाबूंच्या या वक्तव्यानंतर सोशल मिडीयावर एकच खळबळ उडाली आहे.
महेश बाबू हा तेलगुतला एक महागडा अभिनेता आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत तो पहिल्या पाच अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉलिवूडच्या बऱ्याच अभिनेत्यांपेक्षा महेश बाबूची फीज नक्कीच अधिक आहे. चित्रपटांसाठी तो कोटींच्या घरात फीज आकारतो. महेश बाबूची कमाई खरच किती आहे? हे जाणून घेण्यासाठी लोकांची उत्सुकता वाढत आहे.
जाणून घ्या महेश बाबूची एका चित्रपटाची कमाई –
महेश बाबू एका चित्रपटासाठी ३० ते ५० कोटी रुपये घेतो. चित्रपटाचा प्रोजेक्ट ऐकूण ते त्यांची फीज ठरवतात. त्याच वेळी, महेश बाबू सांगतो की, बॉलिवूड मधून मला खूप ऑफर येत आहेत. पण कायम महेश बाबूने बॉलिवूड ला नकार दिला आहे. बॉलिवूडला आपण परवडणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
यासोबत महेश बाबू म्हणतो की, मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. मी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी मला खूप प्रेम आणि आदर मिळाला आहे. मला कायम मोठा चित्रपट करून मोठा माणूस व्हायचे होते. ते देखील माझे स्वप्न पूर्ण झाले. मी भाग्यवान पेक्षा कमी नाही, असं देखील महेश बाबू म्हणतात.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

