मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज रजत पाटीदारने आयपीएल २०२२ (IPL 2022) एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शतकी खेळी केली. रजतने ५४ चेंडूत नाबाद ११२ धावा करत सध्याच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक ठोकले. आरसीबीचा संघ आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचला आहे जिथे त्यांचा सामना आज २७ मे रोजी राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. आयपीएल २०२२ मेगा लिलावात रजत अनसोल्ड होता. रजतच्या कुटुंबीयांनाही तो मे महिन्यात आयपीएल खेळताना दिसेल अशी अपेक्षा नव्हती.
आयपीएलच्या काळात देशात मोठ्या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जात नव्हत्या. या ब्रेकमध्ये पाटीदार कुटुंबीयांना रजतचे लग्न करायचे होते. याचा खुलासा खुद्द रजतचे वडील मनोहर पाटीदार यांनी केला आहे. रजतचा विवाह ९ मे रोजी निश्चित झाला होता. पण त्यानंतर आयपीएलमधून बोलावणे आल्यानंतर रजतने लग्न पुढे ढकलले.
One man show in the eliminator ????
Rajat Patidar ????
????: IPL/BCCI pic.twitter.com/JMbj22T1EG
— CricTracker (@Cricketracker) May 25, 2022
रजतचे वडील मनोहर पाटीदार यांनी सांगितले, की रजतचे लग्न ९ मे रोजी रतलाम येथील मुलीशी होणार होते आणि त्यासाठी आम्ही इंदूरमध्ये हॉटेलही बुक केले होते. पण आरसीबीकडून आयपीएल खेळण्यासाठी निमंत्रण आल्यानंतर लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आला. आयपीएल मेगा लिलावात अनसोल्ड ठरलेला रजत पर्यायी खेळाडू म्हणून आरसीबीमध्ये सामील झाला. त्याने १२ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने अवघ्या ५४ चेंडूंमध्ये शतक केले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

