मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या दुसऱ्या क्वालिफायर (Qualifier 2) सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (RR vs RCB) होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा आहे. आयपीएल २०२२च्या साखळी सामन्यांमध्ये राजस्थान आणि बंगळुरूने चांगली कामगिरी करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. दुसरा क्वालिफायर कोणता संघ जिंकणार हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर राजस्थान रॉयल्सला आरसीबीविरुद्धचा प्लेऑफ सामना जिंकायचा असेल तर त्यांना ७ वर्षांचा इतिहास बदलावा लागेल.
आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्सने चांगली कामगिरी केली होती. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली संघाने १४ पैकी ९ सामने जिंकले ५ पराभव पत्करले. पॉइंट टेबलमध्ये राजस्थानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. त्यामुळे त्याला २ वेळा प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचा गुजरात टायटन्सने ७ गडी राखून पराभव केला. आता संजू सॅमसनच्या संघाला अंतिम फेरी गाठण्याची ही शेवटची संधी आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ साखळी फेरीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी १४ पैकी ८ सामने जिंकले आणि ६ गमावले. पण एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत केल्यानंतर आरसीबीचा उत्साह वाढला आहे. अशा स्थितीत डु प्लेसिसचा संघ राजस्थानला तगडी टक्कर देईल.
Drop a ???? if you want to see an encore of this partnership, 12th Man Army!
Maximum entertainment! ????#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #PlayOffs #RRvRCB pic.twitter.com/FcoR9FADsr
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 27, 2022
आयपीएलच्या प्लेऑफ सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ राजस्थान रॉयल्सविरुद्ध हरला नाही. लीगच्या इतिहासात या दोन संघांमध्ये केवळ एकदाच प्लेऑफ सामना खेळला गेला आहे. आयपीएल २०१५मध्ये आरसीबी आणि राजस्थानने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. या मोसमातील पहिला एलिमिनेटर सामना २० मार्च २०१५ रोजी पुण्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ४ गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या. विजयासाठी १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा संघ १९ षटकांत १०९ धावांत सर्वबाद झाला. बंगळुरूने हा एलिमिनेटर सामना ७१ धावांनी जिंकला. त्या सामन्यात एबी डिव्हिलियर्सने ६६ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

