मुंबई: महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे, आयपीएलचा १५वा सीझन सुरू होण्यापूर्वी ही बातमी धोनीच्या चाहत्यांना मोठा दिलासा देऊ शकते. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने यंदा जेतेपद पटकावल्यास मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी करेल. यासह, आयपीएल २०२२ हा एमएस धोनीच्या आयपीएल कारकिर्दीचा शेवटचा हंगाम असणार नाही.
नुकतीच आयपीएल सोबत महेंद्रसिंग धोनी (ms dhoni) आयपीएलमधून केव्हा निवृत्त होणार अशी आणखी एक चर्चा खूप तापली होती. अनेक क्रिकेटपंडितांचा विश्वास आहे की हे वर्ष एमएस धोनीचे आयपीएलमधील शेवटचे वर्ष असेल. पण तसे नाही, माही सध्या लीगमधून निवृत्त होण्याच्या मनस्थितीत नाही. गेल्या वर्षी चेन्नईत (CSK) एका कार्यक्रमादरम्यान धोनीने याबाबत मोठी घोषणा केली होती.
महेंद्रसिंग धोनीने सांगितले होते की, मला आयपीएलचा शेवटचा सामना चेन्नईत खेळायचा आहे. त्याचवेळी तो असेही म्हणाला होता की ते होण्यासाठी ५ किंवा ६ वर्षे लागली तरी चालेल. धोनीला चेन्नईच्या स्टेडियममधून आयपीएलला अलविदा करायचा आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आयपीएल २०२२ चे सर्व सामने महाराष्ट्रात खेळवले जातील. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी यंदाच्या आयपीएलला अलविदा म्हणणार नाहीये.
महत्वाच्या बातम्या
- “काश्मीर फाईल्स नक्की टॅक्स-फ्री करा पण पेट्रोल-डीझेल…”, रुपाली ठोंबरेंचा मोदी सरकारवर निशाणा
- IPL 2022 : ऋषभची धोनी बरोबर होणाऱ्या तुलनेवर वॉट्सनने दर्शवले मत; सांगितले दोघांमध्ये काय आहे अंतर
- तुझ्यात जीव रंगलामधील लाडू ‘या’ कार्यक्रमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- “आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्यांचं बघायचं वाकून” – अनिल जगतापांकडून फडणवीसांवर टीका
- “निवडणुका होताच मोफत गॅस तर सोडाच उलट…”, नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

