Share

IPL 2022: ‘तेरे को क्या है’ म्हणत दिल्लीच्या ‘धाकड’ फलंदाजानं केली आंब्याची चोरी; खोटं वाटत असेल तर बघा हा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलच्या १५व्या हंगामातील सामने अटीतटीचे होत आहेत. यातील काही सामने तर चांगलेच संस्मरणीय ठरत आहेत. मात्र, कधी कधी सामन्याव्यतरिक्त इतर कारणांमुळेही खेळाडू चांगलेच चर्चेत येतात. असेच दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज पृथ्वी शॉ सोबत घडले आहे. सध्या पृथ्वीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. दिल्लीच्या ट्विटर अकांऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आंब्याचा मोह आवरता येत नाही. खेळाडूंना आंब्याचा आस्वाद घेता यावा यासाठी दिल्ली कॅपिटलच्या सरावादरम्यान काही आंब्यांच्या पेट्या आणण्यात आल्या होत्या. मात्र, दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज पृथ्वी शॉ सरावानंतर चक्क आंबे चोरताना पकडला गेला. त्याने एक-दोन नाही तर चार- पाच आंबे पळवले. समोर बसलेला ललित यादवने त्याला ‘बास कर’ म्हणत टोकले. त्यावर ‘तेरे को क्या है’ असे म्हणत पृथ्वीने आंबे उचलले. दिल्ली कॅपिटलने आपल्या ट्विटरवर ‘भेटा आंबेचोर पृथ्वी शॉला’ म्हणत हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी पृथ्वी शॉने शानदार अर्धशतक झळकावले होते. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पृथ्वी शॉने ५१ धावा केल्या होत्या. ज्यात ७ चौकार आणि २ षटकार मारले होते. त्यानंतर टीमचे प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेही पृथ्वीचे कौतुक केले होते. आयपीएल २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने दोन सामने जिंकले आहेत तर दोन गमावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!