🕒 1 min read
मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने सलग ४ सामने गमावल्यानंतर आयपीएल २०२२ मध्ये पहिला विजय मिळवला. चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा २३ धावांनी पराभव केला. हा विजय कर्णधार रवींद्र जडेजाच्या तुलनेत संघासाठी महत्त्वाचा होता. कारण ४ पराभवानंतर जडेजाच्या कर्णधारपदावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत होते. अशा स्थितीत त्यानेही या विजयाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. जडेजाने कर्णधार म्हणून पहिला विजय पत्नी रिवाबाला समर्पित केला.
आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या पहिल्या विजयानंतर रवींद्र जडेजा म्हणाला, ”कर्णधार म्हणून हा माझा पहिला विजय आहे. मला हा माझ्या पत्नीला समर्पित करायचा आहे. कारण पहिला विजय नेहमीच खास असतो. शेवटच्या ४ सामन्यांमध्ये आम्ही ती रेषा ओलांडू शकलो नाही. पण यावेळी आम्ही एक संघ म्हणून चांगला खेळलो. फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. रॉबिन आणि शिवमने शानदार फलंदाजी केली. गोलंदाजांनीही आपली जबाबदारी चोख बजावली.”
ड्रेसिंग रूमच्या आतून दबाव आहे, का असे विचारले असता जडेजा म्हणाला, “आमच्या मालकांनी आणि व्यवस्थापनाने माझ्यावर कधीही दबाव आणला नाही. कर्णधार म्हणून मी अजूनही वरिष्ठ खेळाडूंचा सल्ला घेतो. अर्थात माहीभाई इथे आहे. मी अजूनही शिकत आहे आणि प्रत्येक सामन्यात मी अधिक चांगले होण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या ड्रेसिंग रुममध्ये अनेक अनुभवी खेळाडू आहेत आणि ते संघासाठी उपयुक्त ठरतात. आम्हाला लय सापडली आहे. आता आम्ही येत्या सामन्यांमध्ये ती कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.”
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022: ‘तेरे को क्या है’ म्हणत दिल्लीच्या ‘धाकड’ फलंदाजानं केली आंब्याची चोरी; खोटं वाटत असेल तर बघा हा VIDEO!
- “तुमचं तोंड कोंबडीच्या कुठल्या भागासारखं आहे”; आव्हाडांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
- धनंजय मुंडेना हृदयविकाराचा धक्का आल्याचे वृत्त चुकीचे – अजित पवार
- IPL 2022 : हॅट्स ऑफ माही..! विराटला आऊट करण्यासाठी धोनीनं खेळली ‘सुंदर’ चाल; VIDEO व्हायरल!
- IPL 2022 MI vs PBKS : आज मुंबई मिळवणार का पहिला विजय? पंजाबविरुद्ध ‘असा’ आहे रोहितसेनेचा रेकॉर्ड!
- “माझ्या धर्माचं मी प्रदर्शन करत नाही”; शरद पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
