कोल्हापूर: उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे. पोटनिवडणूकीसाठी १२ एप्रिल रोजी मतदान पार पडले. आज १६ एप्रिल रोजी मतमोजणी झाली. २६ व्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना ९६२२६ हजार मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना ७७४२६ हजार मते मिळाली आहेत. जयश्री जाधव हे १८ हजार मताधिक्यांनी आघाडीवर आहेत. यामुळे आता ही मतांची आघाडी भेदणे भाजप उमेदवार कदम यांना शक्य होणार नाही. म्हणून महाविकास आघाडी विजय तर भाजप पराभूत हे आता निश्चित आहे.
दहाव्या दहाव्या फेरीअखेरजाधव यांना ४२ हजार ५५५ मत मिळाली होती. तर भाजपच्या सत्यजित कदम यांना ३१ हजार ५३२ मत मिळाली. हे मताधिक्य आता २६ व्या फेरीअखेर जवळपास दुप्पट होऊन ते १८ हजार मतांची झाली आहे. यामुळे आता ही मतांची आघाडी भेदणे भाजप उमेदवार कदम यांना शक्य होणार नाही. म्हणून महाविकास आघाडी विजय तर भाजप पराभूत हे आता निश्चित आहे.
यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय निश्चित झाला असून, त्यांचा दणदणीत विजय झाला आहे. यावर जयश्री जाधव पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, “हा विजय कोल्हापूरकरांच्या आहे. कोल्हापूर हा पुरोगामी विचारांचा आहे म्हणून माझा विजय निश्चित होता. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करते. ”
यावेळी ते दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांची आठवण काढत भावूक झाल्या, “आज आण्णा असायला हवे होते, ही पोटनिवडणुकीची वेळच यायला नको होती. अण्णांची ही हक्काची पाच वर्षे होती, त्यांनी कॉंग्रेसचं प्रामाणिकपणे काम केलं” असे जयश्री जाधव म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या :


