Share

MI vs DC : ह्याला म्हणतात दांडीगुल गोलंदाजी..! अश्विननं दिल्लीच्या बॅट्समनचा ‘असा’ काढला काटा!

Published On: 

मुंबई : ब्रेबॉर्न मैदानावर मुंबई इंडियन्सने आपल्या आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात केली. पहिल्या सामन्यात त्यांना दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान मिळाले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने दिल्लीला १७८ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात दिल्लीची सुरुवात खराब झाली. मुंबईचा फिरकीपटू मुरुगन अश्विनने पहिले यश मिळवून दिले.

धोकादायक पवित्रा धारण केलेला दिल्लीचा सलामीवीर टीम सेफर्टचा अश्विनने त्रिफळा उडवला. चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अश्विनने सेफर्टला बाद केले. त्याचा वळलेला चेंडू सेफर्टला कळला नाही. सेफर्टने ४ चौकारांसह २१ धावा केल्या. याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर अश्विनने मनदीप सिंगलाही तिलक वर्माकरवी झेलबाद केले.

मुंबईचा डाव

मुंबईकडून रोहित शर्मा आणि इशान किशनने चांगली सलामी दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६७ धावा उभारल्या. दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवने रोहितला रोवमन पॉवेलकरी झेलबाद केले. रोहितने ४ चौकार आणि २ षटकारांसह ४१ धावा केल्या. त्यानंतर आलेला अनमोलप्रीत सिंग (८) जास्त धावा काढू शकला नाही. कुलदीपनेच त्याला बाद केले. तिलक वर्माने ३ चौकारांसह २२ धावा करत इशानला चांगली साथ दिली. पोलार्ड, टीम डेव्हिड मोठी खेळी करू शकले नाहीत, इशानने संघाची एका बाजूने पडझड होताना शेवटपर्यंत फलंदाजी केली. दरम्यान त्याने अर्धशतकही पूर्ण केले. २० षटकात मुंबईने ५ बाद १७७ धावा केल्या. इशानने ४८ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ८१ धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीपने १८ धावांत ३ बळी टिपले, तर खलील अहमदला २ बळी घेता आले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!