मुंबई: IPL 2022 चा दुसरा सामना २७ मार्च रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावत १७७ धावा केल्या. ज्यात मुंबईच्या धडाकेबाज फलंदाज इशान किशनने शानदार अर्धशतक ठोकले.
इशान किशन (ishan kishan) रोहित शर्मा (rohit sharma) सोबत सलामीला सामन्यात उतरला. दोघांनीही मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या ६ ओव्हरच्या पॉवरप्लेचा वापर करून एकही विकेट न गमावता ५३ धावा फलकावर लावल्या. मात्र यानंतर कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीमुळे मुंबईचे फलंदाज क्रीजवर टिकण्यात अपयशी ठरत होते. यादरम्यान इशान किशनने एका टोकाला विकेट रोखून झटपट फलंदाजी केली. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक नाबाद ८१ धावांची खेळी केली. यानंतर सोशल मीडियावर इशानची खूप चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : इशान किशननं धुतलं..! मुंबई पलटणचं दिल्लीकरांना १७८ धावांचं आव्हान!
- “कोविड च्या नावावर भ्रष्टाचार…”- यशवंत जाधव प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- IPL 2022: खराब फॉर्ममुळे होता टीम इंडियाबाहेर; पण IPLमध्ये कुलदीपला खेळताना पाहून चाहते झाले आनंदित!
- “… म्हणून ठाकरे मला पण अटक करा म्हणतायेत”- किरीट सोमय्या
- IPL 2022: ‘धोनी मागच्या वर्षीच कर्णधारपद सोडणार होता’ ; कोच फ्लेमिंग यांचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

