Share

IPL 2022 : इशान किशननं धुतलं..! मुंबई पलटणचं दिल्लीकरांना १७८ धावांचं आव्हान!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ आज आयपीएल २०२२चा पहिला सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानावर खेळत आहे. ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान मुंबईसमोर आहे. पंतने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाचीचे आमंत्रण दिले., सलामीवीर इशान किशनच्या दमदार आणि नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने दिल्लीसमोर २० षटकात १७८ धावांचे आव्हान ठेवले.

मुंबईकडून रोहित शर्मा आणि इशान किशनने चांगली सलामी दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६७ धावा उभारल्या. दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवने रोहितला रोवमन पॉवेलकरी झेलबाद केले. रोहितने ४ चौकार आणि २ षटकारांसह ४१ धावा केल्या. त्यानंतर आलेला अनमोलप्रीत सिंग (८) जास्त धावा काढू शकला नाही. कुलदीपनेच त्याला बाद केले. तिलक वर्माने ३ चौकारांसह २२ धावा करत इशानला चांगली साथ दिली. पोलार्ड, टीम डेव्हिड मोठी खेळी करू शकले नाहीत, इशानने संघाची एका बाजूने पडझड होताना शेवटपर्यंत फलंदाजी केली. दरम्यान त्याने अर्धशतकही पूर्ण केले. २० षटकात मुंबईने ५ बाद १७७ धावा केल्या. इशानने ४८ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ८१ धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीपने १८ धावांत ३ बळी टिपले, तर खलील अहमदला २ बळी घेता आले.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन:

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, टिम सेफर्ट, मनदीप सिंग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, खलील अहमद, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंग, कायरन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बेसिल थंपी.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!