🕒 1 min read
मुंबई: IPL 2022 चा दुसरा सामना २७ मार्च रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांचे प्लेइंग ११ ही जाहीर झाले आहेत. मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग ११ मध्ये चार परदेशी खेळाडू खेळताना दिसणार आहेत, तर आज दिल्ली संघात फक्त २ परदेशी खेळाडू खेळणार आहेत. अशा स्थितीत भारताचा लेगब्रेक गोलंदाज कुलदीप यादवलाही आज दिल्लीत संधी देण्यात आली आहे. ज्यामुळे क्रिकेट रसिक आनंदित झालेले दिसत आहेत.
भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला (kuldeep yadav) काही काळ खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. काही दिवसांपूर्वीच त्याला भारतीय संघातूनही वगळण्यात आले होते. त्याच वेळी, केकेआरनेही त्याला रिलीज केले. पण यावेळी लिलावादरम्यान दिल्ली कॅपिटल्सने (DC) कुलदीप यादववर विश्वास दाखवला आणि त्याला २ कोटी रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट केले. इतकंच नाही तर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (MI) या मोसमातील पहिल्या आयपीएल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कुलदीपला खेळायची संधी दिली आहे. अशा परिस्थितीत कुलदीप ट्विटरवर ट्रेंड करत आहे.
कुलदीप मुंबई विरुद्ध शानदार कामगिरी करताना दिसत आहे. त्याने या सामन्यात मुंबईच्या ३ विकेट्स पटकावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “… म्हणून ठाकरे मला पण अटक करा म्हणतायेत”- किरीट सोमय्या
- IPL 2022: ‘धोनी मागच्या वर्षीच कर्णधारपद सोडणार होता’ ; कोच फ्लेमिंग यांचा मोठा खुलासा
- केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून काँग्रेसचे महागाईविरोधात राज्यव्यापी आंदोलन- नाना पटोले
- “पवारांच्या हस्ते उदघाटन नको ही लोकभावना”- गोपीचंद पडळकर
- IPL 2022 : काय सुरुवात केलीय..! रोहितनं आपल्या दोस्तालाच ठोकला यावर्षीचा पहिला षटकार; पाहा VIDEO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
