Share

IPL 2022 LSG vs RCB : मॅचदरम्यान संतापला गंभीर..! कॅप्टननंच ‘घोडचूक’ केल्यामुळं गौतमनं लावला डोक्याला हात; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मनोरंजक एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG vs RCB) अवघ्या १४ धावांनी पराभव केला. रजत पाटीदारच्या शतकी खेळीमुळे आरसीबीने लखनऊसा २०८ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. त्यानंतर लखनऊला निर्धारित २० षटकांत केवळ १९३ धावा करता आल्या. लखनऊने या सामन्यात खराब क्षेत्ररक्षण केले. कर्णधार केएल राहुलने या सामन्यात दोन झेल सोडले आहेत. राहुलने कार्तिकचा झेल सोडला, त्यावेळी संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर आपला राग लपवू शकला नाही.

बंगळुरूच्या डावातील १५वे षटक लखनऊचा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खान टाकत होता. कार्तिकला ३० मीटर यार्डच्या सर्कलमधून एक शॉट खेळायचा होता. पण तो चेंडूला नीट खेळू शकला नाही आणि त्याचा झेल हवेत उडाला. राहुलने मिड-ऑफमधून धावत येत चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, त्याने हवेत सूर मारत झेल थोडावेळ पडकलाही. पण जमिनीवर पडल्यावर त्याच्या हातातून चेंडू निसटला.

https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1529562729627131904?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1529562729627131904%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Fkl-rahul-gambhir-reaction-dinesh%2F

या संपूर्ण घटनेमुळे लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर खूपच निराश दिसत होता. सुरुवातीला, त्याने आनंदाने आणि उत्साहाने टाळ्या वाजवल्या, परंतु जेव्हा त्याने पाहिले की चेंडू राहुलच्या हातातून सुटला आहे, तेव्हा त्याने आपले डोके धरले. जीवदान मिळाल्यानंतर, कार्तिकने पुन्हा एकदा एलिमिनेटर सामन्यात आपले फिनिशिंग कौशल्य दाखवले आणि २३ चेंडूत नाबाद ३७ धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान कार्तिकने ५ चौकार आणि १ शानदार षटकारही ठोकला. केएल राहुलने हा झेल पकडला असता तर कदाचित संघाला एवढे मोठे लक्ष्य मिळाले नसते. त्यामुळे सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!