मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या क्वालिफायर-२ मध्ये पोहोचला आहे. एलिमिनेटरमध्ये, फाफ डु प्लेसिसच्या आरसीबीने लखनऊ सुपर जायंट्स (LSG vs RCB)चा १४ धावांनी पराभव केला. प्रथम खेळताना बंगळुरूने २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊला १९३ धावा करता आल्या. या सामन्यात बंगळुरूकडून युवा फलंदाज रजत पाटीदारने ५४ चेंडूत ११२ धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीमुळे आरसीबीला २०० धावांचा टप्पा गाठता आला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीला रजत पाटीदारची ही खेळी आवडली आहे. सामन्यानंतर विराटने या युवा फलंदाजाचे जोरदार कौतुक केले. रजत पाटीदारचे नाव भविष्यात अनेकवेळा ऐकू येईल, असा दावाही त्याने केला. सामना संपल्यानंतर विराट म्हणाला, ”रजत पाटीदार हे नाव तुम्हाला भविष्यात अनेक वेळा ऐकायला मिळेल. मी अनेक प्रभावी खेळी पाहिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत मी अनेक डाव दडपणाखाली पाहिले आहेत. पण आज रजतने खेळल्यासारख्या फारशा इनिंग्स मी पाहिल्या नाहीत. हा सामना असा होता की, जिथे मलाही तणाव जाणवत होता.”
???? ???? "Haven't seen many better innings than the one Rajat played."
DO NOT MISS: @imVkohli chats with the man of the moment, Rajat Patidar, after @RCBTweets' win over #LSG in Eliminator. ???? ???? – By @RajalArora
Full interview ???? ???? #TATAIPL | #LSGvRCBhttps://t.co/ofEtg6I3Ud pic.twitter.com/TG8weOuZUo
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2022
सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फाफ डु प्लेसिस खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रजत पाटीदारने आघाडी घेतली. मध्य प्रदेशचा फलंदाज पाटीदारला आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. बंगळुरूचा फलंदाज लवनीत सिसोदिया दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर फ्रेंचायझीने रजत पाटीदारला त्यांच्यासोबत जोडले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

