Share

IPL 2022 LSG vs RCB Eliminator : धमाकेदार पाटीदार..! लखनऊची धुलाई करत रजतनं रचला विक्रम; शतक ठोकलं आणि…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामातील एलिमिनेटर सामना लखनऊ सुपर जाइंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर सुरू आहे. सामन्याच्या सुरुवातीला लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २०७ धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी लखनऊला आता मोठी मेहनत करावी लागणार आहे.

बंगळुरू संघातील अनकॅप खेळाडू रजत पाटीदारने धडाकेबाज फलंदाजी करत ११२ धावा कुठल्या. त्याने ४९ चेंडूत शतक पूर्ण केले. आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांमध्ये शतक ठोकणारा रजत पाटीदार हा एकमेव अनकॅप खेळाडू आहे. रजत पाटीदार फलंदाजीसाठी खेळपट्टीवर उतरला तेव्हा बंगळुरूची ४ धावांवर १ गडी बाद अशी अवस्था होती. त्यानंतर पाटीदारने अगोदर विराट कोहली सोबत डावाला सावरले. विराट कोहली बाद झाल्यानंतर त्याने महिपाल लॉमरोरच्या साथीने आणखी काही धावा जोडल्या. महिपाल लोमरोर बाद होताच बंगळुरूचा धडाकेबाज फलंदाज दिनेश कार्तिक खेळपट्टीवर उतरला. यानंतर कार्तिकने आणि पाटीदारने मिळून बंगळुरूचा डाव २०७ धावांवर पोहोचवला. या खेळी दरम्यान पाटीदारला जीवनदानही मिळाले. रवी बिश्नोई च्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या दीपक हुडाकडून पाटीदारचा झेल सुटला होता. रजत पाटीदारने त्याचे आयपीएल इतिहासातील पहिले शतक ठोकले. त्याने ५४ चेंडूत ७ षटकार आणि १२ चौकारांच्या सहाय्याने ११२ धावांची तुफानी खेळी केली.

आयपीएल (IPL) नॉकआउट्स/प्ले ऑफमध्ये शतकं
१२१ वीरेंद्र सेहवाग PBKS vs CSK २०१४ (क्वालिफायर१)
११७* शेन वॉटसन CSK vs SRH २०१८ (फायनल)
११५* वृद्धिमान साहा PBKS vs KKR २०१४ (फायनल)
११३ मुरली विजय CSK ​​vs DC २०१२ (क्वालिफायर २)
११२* रजत पाटीदार RCB vs LSG २०२२ (एलिमिनेटर)

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!