मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा एलिमिनेटर (Eliminator) सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (LSG vs RCB) यांच्यात खेळवला जात आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर रंगणाऱ्या या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रजत पाटीदारच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर बंगळुरूने लखनऊला २०८ धावांचे आव्हान दिले आहे. डु प्लेसि्स, विराट कोहली अपयशी ठरल्यानंतर पाटीदारने लखनऊवर आक्रमण केले. त्याने नाबाद ११२ धावांची खेळी करत बंगळुरूला मजबूत धावसंख्या गाठून दिली. पाटीदारला दिनेश कार्तिकची (नाबाद ३७) उत्तम साथ लाभली.
बंगळुरूचा डाव
लखनऊचा वेगवान गोलंदाज मोहसिन खानने कप्तान फाफ डु प्लेसिसला शून्यावर बाद करत बंगळुरुला पहिला धक्का दिला. त्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला सावरले. पाटीदारने आक्रमक तर कोहलीने संयमी खेळी करत साथ दिली. आवेश खानने टाकलेल्या नवव्या षटकात कोहली (२५) बाद झाला. १० षटकात बंगळुरूने २ बाद ८४ धावा केल्या. पाटीदारने २८व्या चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. कृणाल पंड्याने ग्लेन मॅक्सवेलला (९) एविन लुईसकरवी झेलबाद करत बंगळुरूला तिसरा धक्का दिला. १२व्या षटकात महिपाल लोमरोरने चमीराला चौकार ठोकत बंगळुरूला शतक गाठून दिले. रवी बिश्नोईने लोमरोरला (१४)ल बाद केल्यानंतर १४व्या षटकात दिनेश कार्तिक फलंदाजीला आला. पुढच्याच षटकात कार्तिकला राहुलने, त्यानंतर पाटीदारला दीपक हुडाने जीवदान दिले. १६व्या षटकात पाटीदारने बिश्नोईला ३ षटकार आणि २ चौकार लगावले. कार्तिक-पाटीदारने २४ चेंडूत अर्धशतकी भागीदारी फलकावर लावली. १८व्या षटकात पाटीदारने आवेश खानला षटकार ठोकत शतक साजरे केले. पाटीदारने ५४ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ११२ धावा केल्या. तर कार्तिकने ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३७ धावा ठोकल्या. २० षटकात बंगळुरूने ४ बाद २०७ धावा उभारल्या.
???????????????????????????? ????????????????????!
A stunning maiden IPL ton (1⃣1⃣2⃣*) from Rajat Patidar & a cracking 3⃣7⃣* from @DineshKarthik power @RCBTweets to 207/4. ???? ????
The @LucknowIPL chase to begin shortly. ???? ????
Scorecard ▶️ https://t.co/cOuFDWIUmk #TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/Xw0O1FrYrP
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2022
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), एविन लुईस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, मोहसिन खान, आवेश खान, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

