Share

IPL 2022 LSG vs RCB Eliminator : केएल राहुलनं जिंकला टॉस..! दोन्ही संघात ‘मोठे’ बदल; वाचा Playing 11!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा एलिमिनेटर (Eliminator) सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (LSG vs RCB) यांच्यात खेळवला जात आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर रंगणाऱ्या या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकातामध्ये खराब वातावरणामुळे टॉसला विलंब झाला असला तरी संपूर्ण २०-२० षटकांचा खेळ होईल. लखनऊ संघाने साखळी फेरीत १४ पैकी ९ सामने जिंकून तिसरे स्थान पटकावले. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १४ पैकी ८ सामने जिंकले होते आणि त्यांना दिल्लीच्या पराभवानंतर प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी मिळाली.

लखनऊने कृष्णप्पा गौतम आणि जेसन होल्डर यांना संघाबाहेर केले असून कृणाल पंड्या आणि दुष्मंथा चमीरा यांना स्थान दिले आहे. बंगळुरू संघात मोहम्मद सिराजने कमबॅक केले आहे. लखनऊचा संघ आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात विजय नोंदवत प्लेऑफमध्ये पोहोचला. या सामन्यात दोन्ही संघाच्या गोलंदाजांची भूमिका खूप महत्त्वाची ठरू शकते कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फलंदाजी मजबूत आहे आणि लखनऊला विजय नोंदवायचा असेल तर त्यांना दमदार गोलंदाजी करावी लागेल. लखनऊ संघासाठी, कर्णधार केएल राहुल, क्विंटन डी कॉक आणि दीपक हुडा यांनी आतापर्यंत बहुतेक प्रसंगी योगदान दिले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांचा शेवटचा साखळी सामनाही जिंकला आणि संघासाठी सर्वात चांगली बातमी म्हणजे विराट कोहली फॉर्ममध्ये परतला. प्लेऑफच्या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी विराटने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे आरसीबीचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. याशिवाय फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यांनीही अनेक अप्रतिम खेळी खेळल्या आहेत.

दोन्ही संघांची Playing 11

लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), एविन लुईस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, मोहसिन खान, आवेश खान, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!