मुंबई : काही काळापासून व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) टीम इंडिया (Team India)च्या टी-२० टीमसोबत आयर्लंडला जाणार असल्याचे बोलले जात होते. आता ही गोष्ट निश्चित झाली असून तो मुख्य प्रशिक्षक म्हणून संघासोबत असेल. बीसीसीआय (BCCI)ने याला दुजोरा दिला आहे. लक्ष्मण सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) प्रमुख आहेत.
भारतीय संघ २६ आणि २८ जून रोजी डब्लिनमध्ये दोन टी-२० सामने खेळणार आहे. यादरम्यान राहुल द्रविड भारतीय कसोटी संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर असेल. बोर्डाचे सचिव जय शाह म्हणाले, ”लक्ष्मण संघासोबत डब्लिनला जाणार आहे. राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मण पदभार सांभाळेल. राहुल द्रविड इंग्लंडमध्ये भारतीय संघासोबत असेल. यामुळे लक्ष्मण छोट्या फॉरमॅटच्या टीमसोबत राहणार आहे.
VVS Laxman will step in as India's head coach on their two-T20I tour of Ireland in late June, filling in for Rahul Dravid ???????? https://t.co/7ZTmSD7avY
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 19, 2022
गेल्या वर्षीही असेच काहीसे घडले होते. एनसीएचा तत्कालीन प्रमुख राहुल द्रविडने पांढऱ्या भारतीय संघासह श्रीलंकेचा दौरा केला होता. टीम इंडियाने श्रीलंकेत वनडे आणि टी-२० मालिका खेळली आहे. यावेळी लक्ष्मणकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय संघ आता ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेसोबत टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेनंतरच आयर्लंड दौऱ्यासाठीचा संघ जाहीर केला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

