Share

IPL 2022 LSG vs RCB Eliminator : …म्हणून टॉसला झाला उशीर! मैदानात आलेले कॅप्टन काही मिनिटांतच परतले तंबूत

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) प्लेऑफमधील एलिमिनेटर सामना आज रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि लखनऊ सुपर जाइंट्स यांच्यात संध्याकाळी कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाईल. या सामन्यातील विजयी संघ पुढे जाईल तर पराभव झालेला संघाचा प्रवास येथेच संपेल. मात्र हा सामना सुरू होण्याअगोदर टॉससाठी मैदानात आलेले दोन्ही संघांचे कर्णधार पुन्हा तंबूत परतले आहेत. कोलकात्यातील इडन गार्डन्स मैदानावर अजूनही हलका पाऊस पडत आहे. त्यामुळे या सामन्यातील टॉससाठी उशीर होत असल्याचा पाहायला मिळत आहे. काल झालेल्या सामन्यात गुजरातने राजस्थानचा ७ गडी राखून पराभव केला. त्यामुळे गुजरातचा संघ थेट अंतिम सामन्यात पोहोचला आहे.

सामना रद्द झाल्यास आयपीएलचा नियम काय सांगतो

पावसामुळे किंवा इतर कारणास्तव हा सामना जर रद्द झाला तर यंदाच्या आयपीएल हंगामात या दोन्ही संघांमध्ये जो संघ साखळी फेरीत जास्त गुण मिळवू शकला तो संघ विजयी ठरेल. आयपीएलच्या नियमानुसार प्लेऑफ सामन्यांमध्ये टॉस होण्यापूर्वी पावसामुळे सामन्यास व्यत्यय आला तर त्यासाठी 2 तास राखीव ठेवले जातात. म्हणजे सामन्यात ७.३० ला पहिला चेंडू खेळला जातो. मात्र पावसामुळे टॉस ला उशीर झाला तर सामन्यातील पहिला चेंडू पडण्याची वेळ ९.३० एवढी वाढवली जाते. यानंतरही सामना सुरू होऊ शकला नाही आणि १२.०० या वेळेला सामन्याचा निकाल दोन्ही संघांमध्ये ‘सुपर ओव्हर’ खेळून ठरवला जातो. ही वेळ संपूनही सामना सुरू होऊ शकला नाही तर साखळी फेरीतील गुणतालिकेत जास्त अंक प्राप्त करणारा संघ विजयी घोषित होतो.

दोन्ही संघांच्या संभाव्य Playing ११

लखनऊ – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), एविन लुईस, दीपक हुडा, कृणाल पांड्या, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई

बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक(यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वनइंडू हसरंगा, हर्षल पटेल/आकाश दीप, सिद्धार्थ कौल/मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!