मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी कसोटी क्रमवारीची यादी जाहीर केली. पहिल्या दहा क्रमांकावर फलंदाज आणि गोलंदाजांच्या मानांकनासोबतच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही भारतीय खेळाडूंची उपस्थिती पाहायला मिळत आहे. यासोबतच विदेशी खेळाडूंनाही रँकिंगचा मोठा फायदा झाला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या यादीत कोणत्या खेळाडूंना कोणते स्थान मिळाले आहे ते जाणून घेऊया…
खरे तर प्रथम फलंदाजी क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर भारताचा सलामीवीर रोहित शर्माने विराट कोहलीला मागे टाकले आहे. टीम इंडियाकडून हिटमॅन अव्वल स्थानावर आहे. त्याला या यादीत आठवे ८ वे स्थान मिळाले आहे. रोहित शर्मा एकूण ७५४ रेटिंग गुणांसह ८व्या स्थानावर आहे. यामध्ये मागील क्रमवारी च्या तुलनेत रोहित शर्माची दोन स्थानांनी घसरण झालेली पाहायला मिळते. यासोबतच विराट कोहली ७४२ गुणांसह कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत १०व्या स्थानावर पोहोचला आहे. मागील रविवारच्या तुलनेत विराट कोहलीची स्थानांनी खाली घसरला आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या फलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशेन पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरही ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट दुसऱ्या क्रमांकावरून ४थ्या स्थानावर घसरला आहे.
गोलंदाजी क्रमवारीत अश्विन-बुमराहची चमक कायम
आयसीसी (ICC टेस्ट बॉलिंग रँकिंग) द्वारे जाहीर केलेल्या गोलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचे तर, या यादीत भारताचा आर अश्निन ८५० रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारताचाच जसप्रीत बुमराह ८३० रेटिंग गुणांसह क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने मागील क्रमवारी च्या तुलनेत १० व्या स्थानावरून ३ ऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज पॅट कमिंस कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर दुसरीकडे, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनला याचा फटका बसला असुन तो ५व्या स्थानवर घसरला आहे. ICC Player Test Ranking
अष्टपैलू खेळाडूत जडेजाचा दबदबा कायम
आयसीसी (ICC Test ऑलराऊंडर रँकिंग) ने जाहीर केलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीबद्दल बोलायचे तर, भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ३८५ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन ३४१ रेटिंग गुणांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन यादीत ४ थ्या क्रमांकावर आहे. तर नुकताच इंग्लंड कसोटी टीमचा कर्णधार बांधलेला अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने या यादीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर काइल जेमिसनला या यादीत सातव्या स्थानावर आला आहे. याशिवाय ख्रिस वोक्सचीही एका गुणाने घसरण होऊन तो 10व्या स्थानावर आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

