Share

IPL 2022 : “माझ्यासह सर्वजण…”, मुंबई इंडियन्सच्या सलग आठव्या पराभवानंतर रोहित शर्मानं ‘यांना’ ठरवलं दोषी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा १५व्या हंगामात (IPL 2022) वाईट टप्पा सुरूच आहे. रविवारी मुंबईला आपल्या घरच्या वानखेडे स्टेडियमवरही विजय मिळवता आला नाही. लखनऊ सुपर जायंट्सने त्यांचा ३६ धावांनी पराभव केला. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखालील संघाचा हंगामातील हा सलग आठवा पराभव होता, तो अजूनही पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, की त्यांच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. आपणही बेजबाबदार फटके खेळून आऊट झाल्याचे त्याने सांगितले.

केएल राहुलच्या नाबाद शतकाच्या जोरावर लखनऊने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६८ धावा केल्या. यानंतर मुंबई संघाला ८ गडी गमावून केवळ १३२ धावा करता आल्या. हंगामात सलग आठव्यांदा पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित म्हणाला, ”आम्ही चांगली गोलंदाजी केली आणि त्यांना कमी धावसंख्येवर रोखले. मात्र, आम्हाला चांगली फलंदाजी करता आली नाही. आम्ही भागीदारी करायला हवी होती पण तसे झाले नाही. आम्ही खराब फटके खेळले. मधल्या षटकांमध्ये माझ्यासह सर्वजण बेजबाबदारपणे फटके खेळून बाद झालो.”

रोहित पुढे म्हणाला, ”हे फक्त या सामन्याबद्दल नाही. संपूर्ण स्पर्धेत आम्ही खराब फलंदाजी केली. जबाबदारी स्वीकारून कोणताही फलंदाज शेवटपर्यंत खेळायला तयार नाही.” या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने ६२ चेंडूत १०३ धावांची नाबाद खेळी केली. त्याने १२ चौकार आणि ४ षटकार मारले. राहुलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

राहुल म्हणाला, ”मी परिस्थितीनुसार फलंदाजी केली. आज मी यात यशस्वी झालो याचा मला आनंद आहे. या खेळपट्टीवरील शेवटचे काही सामने माझ्यासाठी चांगले गेले नाहीत, त्यामुळे मी डावाच्या सुरुवातीला सावधपणे फलंदाजी केली आणि स्ट्राईक बदलण्यावर भर दिला आणि परिस्थिती समजून घेऊन डाव पुढे नेला.”

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!