🕒 1 min read
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या मेगा ऑक्शनला अवघे काही दिवस बाकी आहेत. या ऑक्शनमध्ये असलेल्या विविध देशांतील क्रिकेटपटू अंतिम यादी अखेर जाहीर झाली आहे. ज्यात एकूण ५९० खेळाडू आहेत. १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगळुरू येथे दोन दिवस मेगा ऑक्शन होणार आहे.
आयपीएलचा हा १५वा हंगाम असणार आहे. जागतिक क्रिकेटमधील काही दिग्गज स्टार्स या स्पर्धेसाठी एकत्र येणार आहेत. ऑक्शनसाठी नोंदणी केलेल्या ५९० खेळाडूंपैकी २२८ कॅप्ड खेळाडू, ३५५ अनकॅप्ड खेळाडू आणि ७ सोसिएट नेशन्सचे खेळाडू आहेत. श्रेयस अय्यर, शिखर धवन, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, इशांत शर्मा, उमेश यादव असे मोठे नाव या ऑक्शन मध्ये असणार आहेत.
???????????? ???????????????????? ???????? ???????????? ???????????????? ???????????????????????????? ????????
A bidding war on the cards ???????? ????????
Here are the 1⃣0⃣ Marquee Players at the 2⃣0⃣2⃣2⃣ #IPLAuction ???? pic.twitter.com/lOF1hBCp8o
— IndianPremierLeague (@IPL) February 1, 2022
यंदा आयपीएल मध्ये दोन नवे संघ आले आहेत यामुळे यावेळी १० संघ क्रिकेटमधील काही मोठी नावे आपल्या संघात घेण्यासाठी बोली लावताना दिसतील. फाफ डु प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, जॉनी बेअरस्टो, जेसन होल्डर, ड्वेन ब्राव्हो, शाकिब अल हसन ते वानिंदू हसरंगा असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही या ऑक्शन मध्ये आहेत.
आयपीएलच्या टॅग लाईनच “इथे प्रतिभेला संधी मिळते” असे असल्याने यश धुल, विकी ओस्तवाल, राजवर्धन हंगरगेकर यासारखे भारताचे अंडर १९ चे स्टार आणि देवदत्त पडिक्कल, हर्षल पटेल, कृणाल पंड्या, शाहरुख खान यांसारखे काही चर्चेत असलेले भारतीय क्रिकेटपटूंना चांगल्या संघात खेळायची संधी मिळते का हे बघणे रंजक असेल.
महत्वाच्या बातम्या
- “देशातील दोनचार श्रीमंत आणखी किती श्रीमंत होत जातात पाहूच”, संजय राऊतांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
- ‘अर्थसंकल्पात देशवासीयांची फसवणूक’; शिवसेना नेते विनायक राऊतांची टीका
- “दुसरा कपिल देव शोधणे बंद करा”, गंभीरचा भारतीय संघाला सल्ला
- “गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही”, अर्थसंकल्पावर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया
- ‘हे निवडणुकीचं बजेट’; आदित्य ठाकरेंची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
