Share

IPL 2022: के एल राहुलच्या कमी स्ट्राईकरेट बाबत कुंबळेचे वक्तव्य; म्हणाला “आम्ही कोणाला…”

Published On: 

मुंबई : आयपीएलच्या या हंगमात पंजाब किंग्स पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार आहे. यावेळी पंजाब किंग्समध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा प्रवेश झाला आहे. यासोबतच संघाची धुरा मयंक अग्रवालच्या हातात देण्यात आली असून तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. पण आतापर्यंत या संघाचा माजी कर्णधार म्हणजेच के. एल राहुलची चर्चा संघात थांबलेली नाही. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी के. एल राहुलच्या स्ट्राइक रेटबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

२०२१च्या आयपीएलमध्ये के. एल राहुलची (KL Rahul) खेळी चांगली होती. मात्र त्याचा स्ट्राईकरेट कमी होता. तो १२९.३४ आणि १३८.४० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना दिसला, जे वाईट नाही परंतु राहुल अधिक स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आता स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनिल कुंबळे (anil kumble) म्हणाले की, राहुलच्या स्ट्राईक रेटमागे संघ व्यवस्थापनाचे कोणतेही नियोजन नव्हते.

कुंबळे म्हणाले ,“मला वाटत नाही की आम्हाला कोणत्याही खेळाडूने कमी स्ट्राइक रेटने खेळावे असे वाटते. आपण या स्वरूपात तो दृष्टिकोन स्वीकारू शकत नाही. मयंक अग्रवाल (mayank agarwal) किंवा शिखर धवनचा नैसर्गिक खेळ आक्रमणाचा आहे. इतर खेळाडूंनाही त्यांच्या नैसर्गिक खेळाशी छेडछाड न करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे असे काहीच नव्हते.” के एलच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने २ वर्षे फारशी कामगिरी केली नाही. यानंतर, तो आयपीएल २०२२ पूर्वी पंजाब किंग्सपासून वेगळे झाला. आता तो नव्याने लखनऊ सुपरजायंट्सची धुरा सांभाळणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!