🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (१८ मार्च) होळीच्या निमित्ताने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच यावेळी बोलत असतांना राऊतांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच ठाकरे सरकारला अडीच वर्ष झाली असून अजून अडीच जातील आणि पुढील पाच वर्ष पुन्हा आम्हीच सत्तेत येणार, असा दावाही यावेळी राऊत यांनी केला.
यावेळी बोलत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘शिवसेना मोठा पक्ष असून शिवसेनेचे आव्हान आहे. ज्याचे आव्हान असते त्याच्याविरोधात बोंब मारली जाते. भाजपच्या दंडात ताकद आहे असे त्यांना वाटत असते. परंतु तसेच नाही कारण ते पाठीमागून वार करतात’, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘राजकारणात पाठीमागून होणारे हल्ले पचवायचे असतात आणि आम्ही ते पचवत आहोत.’ तसेच ठाकरे सरकारला अडीच वर्ष झाली असून अजून अडीच जातील आणि पुढील पाच वर्ष पुन्हा आम्हीच सत्तेत येणार,असा दावाही यावेळी राऊत यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राची आधुनिक शांताबाई! सनी लियोनी थिरकणार ‘शांताबाई’ गाण्यावर..
- “भाजपला कोणीही घाबरत नाही”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- रत्नागिरीत दोन पालख्या भेटीचा नयनरम्य सोहळा!
- IPL 2022: बायो बबलमध्ये खेळाडूंचे होळी सेलिब्रेशन, आवेश आणि व्यंकटेश अय्यर थिरकले
- “होळी वर्षातून एकदा येते पण यांचा शिमगा…”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
